आध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि वैद्यकीय सेवा

आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ज्योतिष विज्ञानाच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखण्यासाठी समर्पित.

श्रीनाथ हॉस्पिटल - तुमच्या आरोग्यासाठी समर्पित

आधुनिक वैद्यकीय उपचार व पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींचा मिलाफ असलेले रुग्णालय.

ग्रामीण आरोग्य आणि ज्योतिष तज्ञता

ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे आणि ज्योतिष व आरोग्य समस्यांचे उपाय.

ज्योतिष, शिक्षण आणि साहित्यसेवा

ज्योतिष शास्त्र, आरोग्य, शिक्षण, आणि साहित्य क्षेत्रात अविरत योगदान देणारे व्यक्तिमत्व.

अध्यात्म, आरोग्य आणि समाजसेवा

आध्यात्मिक मार्गदर्शन, आरोग्य उपचार, आणि समाजकल्याणासाठी समर्पित जीवन.

आमच्याबद्दल

नाव : डॉक्टर एकनाथ घनश्यामराव मुंडे (नाथरेकर)

गाव : नाथरा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड.

शिक्षण : एफ. सी. आय. एम., डी. एच. एम. एस . (मुंबई), एम. डी. आयुर्वेद आणि ॲक्युप्रेशर (आ.)

विशेषज्ञता : मेडिकल ऍस्ट्रोलॉजिस्ट, ज्योतिष्य वैद्यक तज्ञ, ज्योतिष्य, आयुर्वेद, अध्यात्मिक, धार्मिक, आयुर्वेद, होमिओपॅथिक चिकित्सक, ऍलोपॅथिक चिकित्सक.

दवाखाना : श्रीनाथ हॉस्पिटल, परळी वैजनाथ

पुरस्कार : ज्योतिष्य प्रवीण, ज्योतिष्य भूषण, ज्योतिष्य सरस्वती, ज्योतिष्य पद्म, ज्योतिषाचार्य, दैवज्ञश्री, ज्योतिष्यमार्तंड, पंडित महोपाध्याय (ज्योतिष्य मधील सर्वात मोठी पदवी), रुग्णसखा, सेवा रत्न, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, वैद्यनाथ पुरस्कार (ग्रामरत्न)

लेखन : लेखक आणि कवी, "वाणेचे पाणी", समंजस, स्पंदन कविता संग्रह, स्वराज कविता संग्रह, निरोगी राहण्याचे सुलभ उपाय, समरस, सुखानंद (बोटांनी आजार घालवा)

संपादन : सेवा वार्ता मासिक, स्वास्थ्य रक्षा ज्योत, आयुर्वेद ज्योतिष्य, आरोग्य रक्षा, महिला बालकल्याण, "येणेच पंथे चालो जाता" (पंढरीची वारी विशेष अंक), पुणे येथील ग्रहांकित, ज्योतिष्यज्ञान मासिक, नाशिक येथील भालचंद्र मासिक प्रकाशन

अध्यक्ष : श्रीनाथ मानव सेवा मंडळ, परळी वैजनाथ संचलित – इच्छापूर्तीश्वरनाथ धर्मार्थ औषधोपचार केंद्र (नाथरा), इंदिरा बाल सदन (नाथरा), पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय (नाथरा)

विशेष उपचार : जुनाट आजार, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक समस्या, वंधत्व व विवाह, आर्थिक समस्या – मेडिकल एस्ट्रोलॉजी पद्धतीने मार्गदर्शन व उपचार

मंदिर : इच्छापूर्तीश्वरनाथ महादेव मंदिर, नाथरा

सामाजिक कार्य : समाजसेवा, ग्रामीण भागात मोफत मार्गदर्शन व शिबिरे, आरोग्य-निदान-उपचार शिबिरे, वार्षिक मराठी साहित्य संमेलन, मराठी भाषेचा प्रचार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सांस्कृतिक व धार्मिक भजन-कीर्तन आयोजन, आरोग्यविषयक लेखन व प्रकाशन, सेवावार्ता-वार्ताहर, नाथरा येथे साप्ताहिक मोफत औषध उपचार वाटप

घोषवाक्य : "डॉक्टर नव्हे तो वैद्य खरा, ज्योतिषी नव्हे तो मानवी सुख देणारा साथी खरा"

ब्रीदवाक्य : "शरीरच रोग बरा करतो आणि फक्त मार्गदर्शन करतो"

विशेषज्ञ वैद्य

आरोग्यविषयक विभाग

संशोधन केंद्रे

पुरस्कार व सन्मान

आमच्या सेवा / सुविधा

"शरीरच रोग बरा करतो, आम्ही फक्त मार्गदर्शन करतो"

मेडीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजी पद्धतीने मार्गदर्शन व उपचार

ज्योतिष तज्ञ

शुद्ध आयुर्वेद पद्धतीने निदान व उपचार

मॉडर्न होमिओपॅथीक पद्धतीने निदान व उपचार

आवश्यक असलेल्या सर्व पद्धतीने निदान व उपचार

विशेष उपचार

  • जनेटिक आजार
  • शारीरिक तसेच मानसिक तणावामुळे होणारे आजार व उपचार
  • कौटुंबिक, नपुंसकत्व, वंध्यत्वावर उपचार
  • वाह, आर्थिक समस्या मेडीकल अ‍ॅस्ट्रॉलॉजी पद्धतीने मार्गदर्शन व उपचार
  • जन्मपत्रिका आणि स्वभाव

संस्थेविषयी

"श्री ईजीएम इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च हेल्थ सर्व्हिस अँड ह्युमन गाइड सेंटर", (नाथरा) परळी वैजनाथ ही संस्था "श्रीनाथ मानवसेवा सेवा मंडळ" या संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या दोन्ही संस्था डॉ. एकनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहेत.

"श्रीनाथ मानवसेवा सेवा मंडळ" ही १९९५ साली स्थापन झालेली बहुउद्देशीय संस्था आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी रुग्णसेवा, आरोग्य-जागरूकता, शेतीविषयक मार्गदर्शन आणि समाजसेवेचे कार्य ही संस्था सतत करत आहे.

शेतकऱ्यांना फवारणी व विषारी औषधांची सुरक्षित हाताळणी, पाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले जाते. १९९५ पासून मोफत रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे आणि आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने डायबेटीस, हायपरटेन्शनवरील उपचार सुरू आहेत.

संस्था अपंग, निराधार, महिलांना मदत करते. किडनी व हृदय शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले जाते. पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, संगणकीय ज्ञान, क्रीडांगण व सांस्कृतिक उपक्रमांची सुविधा दिली जाते.

धार्मिक आणि सामाजिक कार्य

इच्छापूर्तीश्वरनाथ महादेव मंदिर (नाथरा) दिनांक २६.०३.२०१८ रोजी स्थापण्यात आले. हे मंदिर पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात असून, डॉ. एकनाथ मुंडे यांनी याची स्थापना केली.

इच्छापूर्तीश्वरनाथाचे दर्शन घेऊन भक्तांनी मनोकामना व्यक्त करावी, अशी श्रद्धा आहे. भावभक्तीने पूजा केल्याने कौटुंबिक, आर्थिक व मानसिक अडचणी दूर होतात, असा अनुभव आहे.

गेल्या दहा वर्षांपासून दर शनिवारी डॉ. मुंडे मोफत रोगनिदान व उपचार सेवा देत होते. आता ही सेवा दर शुक्रवारी उपलब्ध आहे. पंचक्रोशीतील महादेव मंदिरांमध्ये या मंदिराने विशेष स्थान प्राप्त केले आहे.

पुस्तके आणि लेख

डॉ. एकनाथ मुंडे यांनी आजपर्यंत ७ पुस्तके लिहिली असून सुमारे १००० हून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. पुण्यातील "ग्रहांकित", "ज्योतिषज्ञान" मासिक तसेच नाशिक येथील "भालचंद्र" मासिक यामध्ये त्यांचे लेख सातत्याने प्रकाशित होतात.

मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील सर्वच दैनिक, साप्ताहिक, मासिकांमध्ये त्यांचे आरोग्य व ज्योतिषविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. "भविष्य दर्पण", दिवाळी अंक, विशेषांक यामध्येही लेख प्रकाशित झाले आहेत.

डॉ. मुंडे हे मराठी भाषेचा प्रचार, साहित्य संमेलने आयोजित करणे आणि ग्रामीण भागात साहित्य संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांनी पाच साहित्य संमेलने आयोजित केली असून सहाव्या संमेलनाची तयारी सुरू आहे.

📞 संपर्क माहिती – श्रीनाथ हॉस्पिटल

🏥 पत्ता:

श्रीनाथ हॉस्पिटल "कमलनाथ सदन", गांधी नगर,
बस स्टँड ते गार्डन रोड, परळी वैजनाथ,
तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड – पिन: ४३१५१५

📱 मोबाईल क्रमांक:

▪ ९८५०११९३९३
▪ ९८५०२४९३९३

🕒 वेळ:

▪ सकाळी: ११ ते २
▪ संध्याकाळी: ५ ते ८

📧 ई-मेल:

▪ info@egmhealthservices.com
▪ dreknathmunde@egmhealthservices.com

🏥 आमच्या सेवा / सुविधा

"शरीरच रोग बरा करतो, आम्ही फक्त मार्गदर्शन करतो."

  • 🔹 मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजी पद्धतीने मार्गदर्शन व उपचार
  • 🔹 ज्योतिष तज्ञांकडून सल्ला व विश्लेषण
  • 🔹 शुद्ध आयुर्वेद पद्धतीने निदान व उपचार
  • 🔹 आधुनिक होमिओपॅथी पद्धतीने निदान व उपचार
  • 🔹 आवश्यकतेनुसार सर्व पद्धतींचा समन्वयित वापर

🌿 विशेष उपचार सेवा

  • जननसंबंधित आजारांवर उपचार
  • शारीरिक तसेच मानसिक तणाव व आजारांवर उपचार
  • कौटुंबिक समस्या, नपुंसकत्व, वंध्यत्व यावर उपाय
  • विवाह व आर्थिक समस्यांवर मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजीद्वारे मार्गदर्शन
  • जन्मपत्रिकेच्या स्वभावगुणधर्मानुसार औषधोपचार
  • जन्मपत्रिकेवर आधारित सखोल मार्गदर्शन
  • विवाह समस्यांवर उपाय योजना

अपॉइंटमेंट

अपॉइंटमेंटसाठी आवश्यक माहिती खाली नमूद करा.

लोडिंग...
तुमची अपॉइंटमेंट यशस्वीरित्या नोंदवली आहे. धन्यवाद!